Thu. Sep 29th, 2022

‘हाऊसफुल्ल 4’ मुळे मराठी सिनेमांना थिएटर्स नाही? मनसे आक्रमक

तर त्या चित्रपटाला स्क्रिन मिळायलाच हव्यात.

दिवाळीनिमित्त दरवर्षीच बॉक्स ऑफिसवर एकाहून एक सिनेमे रिलीज होतात. यावेळीही दिवाळीचं औचित्य साधून मराठी आणि हिंदी सिनेमे रिलीज होत आहेत. यातील ‘Housefull 4’ सिनेमाची स्टरकास्ट आणि बजेट मोठं आहे. हा सिनेमा रिलीजही मोठ्या स्तरावर होतोय. मात्र त्यामुळे मराठी सिनेमांना थिएटर मिळणं कठीण झालंय. प्रसाद ओक यांचा ‘हिरकणी’ आणि संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ हे मराठी चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमांना थिएटर मिळायला अडचण होत असल्यामुळे पुन्हा एकदा मनसे (MNS) आक्रमक झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

हिरकणी आणि ट्रिपल सीट या आगामी चित्रपटांना चित्रपटगृह दिले नाही तर काचा फुटनार असा इशारा मनसेने दिला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर मराठी-हिंदी भाषेतील बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मात्र मराठी चित्रपटांना चित्रपटगृहमध्ये पुरेशा जागा उपलब्ध होत नसल्याचे आपल्याला वारंवार पाहायला मिळते.

दर आठवड्याला मराठी चित्रपटांना जागा मिळवण्यासाठी भांडावं लागत असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे.

हिरकणी आणि ट्रिपल सीट हे दोन चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार असून हिरकणी चित्रपटासारखा ऐतिहासिक विषय घेऊन मराठीमध्ये चित्रपट होत आहे. त्यामुळे या चित्रपटाला जागा मिळायलाच हवे.

लहानपणापासून ती कथा ऐकत आलोय. त्यामुळे अशा चित्रपटाला थिएटर मिळणार नसतील, तर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे म्हणावे लागेल.

मग खळ्ळखट्याक करुनच थिएटर मालकांचे डोळे उघडणार असतील तर ते करु असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.