Thu. Feb 25th, 2021

… तर राजकारणातून संन्यास घेईन – अजित पवार

 

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ध्यामध्ये सभा घेतली होती. या सभेत मोदींनी शरद पवार आणि पवार कुटुंबावर घणाघाती टीकाही केली. मावळ येथे शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात आरोपींना मोकळे याच लोकांनी सोडल्याचा आरोप मोदींनी केला. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी प्रयुत्तर दिले आहे. मावळ गोळीबारप्रकरणी माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

वर्धा सभेत पंतप्रधान मोदींनी मावळ गोळीबार प्रकरणी पवार कुटुंबावर घणाघाती टीका केली.

मोदींनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मावळ गोळीबारप्रकरणी माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असे अजित पवार म्हणाले आहे.

मी अधिकाऱ्यांना, पोलिसांना या प्रकरणी सूचना दिल्या होत्या का हे सिद्ध करून दाखवा असेही त्यांनी म्हटलं आहे.

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी न करता देशाची करावी असा टोलाही लगावला आहे.

काय आहे मावळ गोळीबार प्रकरण ?

पुणे जिल्ह्यातल्या पवना धरणातले पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यायला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

हा मोर्चा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर २०११ साली काढण्यात आला होता.

या मोर्चात शिवसेना-भाजप आणि आरपीआय हे पक्ष सहभागी झाले होते.

यावेळी पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला.

यामध्ये ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *