Sun. May 16th, 2021

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला तर … – कन्हैया कुमार

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आपला वचननामा जाहीर करत आहे. भाजपाने आपला वचननामा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कौन्सिल कन्हैया कुमार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. भाजपाने आपल्या वचननाम्यात स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे म्हटलं आहे. इंग्रजांकडे माफी मागणाऱ्या स्वातंत्रवीर सावकरांना भारतरत्न पुरस्कार दिला तर देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांचा अपमान ठरेल असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले कन्हैया कुमार ?

भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कौन्सिल कन्हैया कुमार यांनी स्वातंत्रवीर सावरकरांबाबत खळबळजनक विधान केले आहे.

भाजपाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे म्हटलं आहे.

इंग्रजांकडे माफी मागणाऱ्या स्वातंत्रवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला तर देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांचा अपमान ठरेल असे वक्तव्य कन्हैया कुमार यांनी केले आहे.

एवढेच नाही तर वाढत्या बेरोजगारी आणि बेकारीबाबत कोणीच प्रश्न विचारू नये म्हणून केलेले हा चुनावी जुमला असल्याचेही कन्हैया कुमार यांनी सांगितले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *