उत्पन्न हवं असेल तर मंत्र्यांनी बंगले भाड्याने द्यावे – राज ठाकरे

महाराष्ट्रातील काही गड-किल्ले भाड्याने देणार असल्याचे राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्व स्तरावरून टीका केली जात आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा राज्य सरकारवर खरमरीत टीका केली आहे. गड-किल्ले भाड्याने दिले तर त्याचे वाईट परिणाम दिसतील असे राज ठाकरे म्हणाले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणामुळे राज्य सरकारवर घणाघाती टीका केली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार घणाघाती टीका केली आहे.
सरकारला उत्पन्न हवे असेल तर मंत्र्यांनी बंगले भाड्याने द्यावे असे राज ठाकरेंनी सांगितले आहे.
महाराष्ट्रला भूगोल आणि इतिहास असून सरकारला याचे काही देणं-घेणं नसल्याचे म्हटलं आहे.
राज ठाकरे दोन दिवसासाठी डोंबिवली दौऱ्यावर आहेत.
यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बातचीत करणार आहेत.
डोंबिवलीला जाताना राज ठाकरे यांना शिळफाटा येथे वाहतुककोंडी आणि खड्ड्यांचा सामना करावा लागला.