Sat. Jul 31st, 2021

शाहरूख खानचा जुना व्हिडिओ व्हायरल…

सध्याला शाहरूख खान याचा फॅनक्लब इन्स्टाग्रामवर ‘कॉफी विथ करण’या शोमधला व्हिडिओ व्हायरल होतं. या शोमध्ये शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित होते. त्याचवेळी करणने आलियाला अचानक एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “आलिया तू किती वर्षांची असताना तुझा पहिला बॉयफ्रेंड होता? आलिया उत्तर देत १६ असं बोलतो. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशी? या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल.” या शोमध्ये शाहरूख त्याची मुलगी सुहानासाठी पजेसिव वडील असल्याचे स्वत: शाहरूखने सांगितले. शिवाय सुहाना ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आता सध्याला सुहानाच शिक्षण न्यूयॉर्कमध्ये सुरू आहे. सुहाना ही नेहमीच तिच्या मित्र-मैत्रिंनीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. शाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा धमाल करायला येत आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण झळकणार आहे, शिवाय सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *