Tue. Aug 9th, 2022

‘गद्दार आहोत तर परत बोलवता कशाला?’

शहाजी बापू पाटलांनी आपल्या रोखठोक भाषेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना सवाल विचारला आहे. “आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. “आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत, आम्हाला अपमानित करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार दुखावले जात आहेत. आम्हाला थेट गद्दार म्हणणं योग्य नाही. उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत.

आमची गद्दारी नाही तर आम्ही खुद्दारी आहे. उद्धव ठाकरे काही बोलले तर त्यांचे शब्द आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणं चुकीचं आहे. इथं प्रत्ये आमदारांचे वय कोणाच ५०, कोणाचं ६०, कोणी ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने लहाणपणीच दिलेला असतो. पण या पोराला काय शिकवलंय की नाही हे समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही,” अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.