Wed. Oct 5th, 2022

IIMA च्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमध्ये (IIMA) शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये बुधवारी आढळला असून मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट न सापडल्यानं मृत्यूचे कारण अद्यापही कळले नाही आहे.

कॉलेजमध्ये या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या तरुणीनी खुद्द आत्महत्या केल्याचं वर्तवली जात आहे. शिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रिष्टी राज (Drishti Raj )असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती हॉस्टेलच्या रुममध्ये एकटीच राहत होती. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तिच्या मैत्रिणी रुमचा दरवाजा ठोठावत होत्या मात्र बराच वेळ आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने मैत्रिणींनी हॉस्टेल प्रशासनाला कळवलं, त्यानंतर हॉस्टेलच्या गार्ड्सनी तिच्या रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत द्रिष्टीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणाची माहीती ही तातडीने पोलिसांना देण्यात आली.

मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्यानं तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली जात आहे. द्रिष्टी फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शिवाय याप्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. द्रिष्टी WhatsApp चॅट देखील तपासले जाणार आहेत. द्रिष्टीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सध्या याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्यानं इतर अँगल्सनीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. अशी घटना घटल्यानं कॅम्पसमध्ये दुखाचे वातावरण निर्माण झालं आहे. याबद्दल आयआयएमएच्या विद्यार्थिनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.