Mon. Jul 22nd, 2019

पुण्यात पुन्हा कौमार्यचाचणीची कीड!

0Shares

कंजारभाट समाजाला लागलेली कौमार्यचाचणीची कीड संपायचं काही नाव घेत नाहीय. पुण्यात नुकतीच समाजानं पुन्हा दोन नववधूची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यात उच्चशिक्षित वरानेही वधुची कौमार्य चाचणी घेतल्याची घटना घडली होती. यावेळी सर्व स्तरातून कंजारभाट समाजावर टीका झाली होती. यावेळी तर चक्क 2 वधुंची कौमार्य चाचणी घेतल्याची लाजिरवाणी घटना घडल्याचा आरोप केला जातोय.

काय घडलंय नेमकं?

21 जानेवारीला विवाह पार पडला.

22 जानेवारी रोजी एका वधूची, तर नंतर दुसऱ्या वधूची चाचणी झाली.

यामध्ये वराचे वडील नंदुरबार इथल्या न्यायालयातील निवृत्त अधीक्षक आहेत.

वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.

कोण रोखणार या कुप्रथा?

वारंवार घडणाऱ्या या समाजातील कुप्रथा रोखण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कमी पडत असल्याचा आरोप शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलाय.

या घटना रोखण्यासाठी केवळ पोलीसच नाही तर समाजाने यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
यासंदर्भात संबंधीत कुटुंबाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न जेव्हा ‘जय महाराष्ट्र’च्या प्रतिनिधींनी केला, तेव्हा या घटनेबाबत काहीही बोलण्यास कुटुंबाने नकार दिला.

अशी घटना घडली नसल्याचा दावा ही कुटुंबाने केलाय.

राज्य सरकारने जात पंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला आहे. मात्र कंजारभट समाज या कायद्याला जुमानत नाही.

लपूनछपून जात पंचायती भरत आहेत.

त्यामुळे अशा कुप्रथा नष्ट करायच्या असल्यास समाजातीलच सर्वांनी पुढं आलं पाहिजे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: