Sat. Nov 27th, 2021

सिंधुदुर्गात अनधिकृतपणे बैलांची झुंज सुरुच

बैलांच्या झुंजीना सरकारची बंदी आहे. तरीही सिंधुदुर्गात अनधिकृतपणे बैल झुंजी सुरुच आहेत. यासर्व प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे.

कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलाच्या झुंजी लावल्या जातात. कुडाळ तालुक्यातील नानेली गावात बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून बैलाच्या झुंजी लागल्या होत्या.

मात्र हाकेच्या अंतरावर माणगाव पोलीस स्थानक आहे. तरीही या ठिकाणी दीड ते दोन तास बैल झुंजी सुरु होत्या.

पोलिसांजवळ यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. यावेळी झुंज पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

जिल्ह्यातील अनेक गावातून बैलांना झुंजीसाठी येथे आणण्यात आले होते.

वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन या संदर्भात देशात ‘विहित’ स्वरूपात कायदे आहेत.

यानुसार प्राण्यांना त्रास देणे प्राण्याचा छळ करणे, प्राण्यांना इजा करणे, त्रास देणे हे सर्व कायद्याने गुन्हे स्वरूपाचे आहे. .

यामुळेच बैलगाडी स्पर्धेवर सुद्धा बंदी आली. या नंतर बैलांच्या झुंजी लावणे प्रकार आणि प्रथा विविध ठिकाणी सुरू झाली. त्यामुऴे बैलगाडी स्पर्धांची जागा ‘बैलांच्या झुंजी ‘ने घेतली.

यातून मोठया प्रमाणात मनोरंजन होते. तरीही यामुळे प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते.

आपल्या आनंदासाठी 2 बैलांची झुंज लावली जाते. दोघांचे भांडण हेच मनोरंजन या प्रकारात हे सर्व सुरू असते. विविध बैलजोडी येतात आणि त्यांच्या झुंजी लावल्या जातात.

तळ कोकणात या झुंजी आता वाढत आहेत. त्यामुळे यासर्व प्रकाराकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी विनंती प्राणी मित्र संघटनांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *