Fri. Aug 6th, 2021

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही – सुमित्रा महाजन

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असतानाच लोकसभेच्या अध्यक्ष आणि इंदूरच्या विद्यामान खासदार सुमित्रा महाजन निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. सुमित्रा महाजन यांनी एका पत्रकाद्वारे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच भाजपाने इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी इंदूरच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

सुमित्रा महाजन यांनी पत्रकात काय म्हटलं ?

लोकसभेच्या अध्यक्ष आणि इंदूरच्या विद्यामान खासदार सुमित्रा महाजन निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
सुमित्रा महाजन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिल्याचे समजते आहे.
भाजपाने अद्याप इंदूर मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला नाही.
उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे सुमित्रा महाजन यांच्या नावाचा विचार करण्याबाबत संभ्रम निर्माण झाले होते.
तसेच त्यांना फेरउमेदवारी देण्यात येणार की नाही याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
मात्र सुमित्रा महाजन यांनी या चर्चेला पूर्णविराम देत नाराजीपत्र पक्षाला पाठवले आहे.
पक्षश्रेष्ठींनी इंदूरमध्ये योग्य उमेदवाराचा निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *