‘मी एकदिवसीय सामना खेळण्यासाठी तयार’ – विराट कोहली

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली एकदिवसीय सामना मालिकेत खेळणार नाही, यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता विरोट कोहली यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी एकदिवसीय सामना खेळण्यासाठी तयार असून माझ्या विरोधात खोट्या बातम्या पसरलव्या जात आहेत, असा दावा भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी केला आहे.
‘दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी मी तयार आहे. मी निवडीसाठी नेहमीच उपलब्ध असल्याचे’ विराट कोहली यांनी स्पष्ट केले आहे.
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. टी-२० कर्णधारपदाच्या एकूणच सर्व विषयावर विराट बरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करुन त्याला टी-२०चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. यानंतर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, असे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले.