Sat. May 25th, 2019

‘मेरा भारत महान, मेरी मॅडम महान!’

0Shares

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात कैद असलेला हमीद अन्सारी याची सुटका होऊन तो भारतात परतला आहे. बुधवारी सकाळी नवी दिल्ली येथे हमीद आणि त्याच्या आईने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान हमीदच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्वराज यांच्याबद्दल बोलताना ‘मेरा भारत महान, मेरी मॅडम महान’ असं विधान हमीदची आई फौजिया यांनी केलं.

कोण आहे हमीद अन्सारी?
हमीद अन्सारी हा मुंबईचा रहिवासी आहे.
हमीद फेसबुकवर पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला आणि तो तिच्याशी ऑनलाईन चॅटिंग करू लागला.
आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो घरच्यांशी खोटं बोलला. 
आपल्याला अफगाणिस्तानात नोकरी मिळाल्याचं घरच्यांना सांगून तो अफगाणिस्तानला गेला.
अफगाणिस्तानातून बनावट पासपोर्ट बनवून तो पाकिस्तानात आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. 
मात्र पाकिस्तानात बनावट पासपोर्टमुळे तो पकडला गेला आणि हेरगिरीच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आलं.
पाकिस्तानातील सैनिकी कोर्टात त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला.
मात्र त्याच्यावरील हेरगिरीचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
हमीद ६ वर्षांपासून पेशावरच्या मध्यवर्ती कारागृहात कैदी होता.
त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारने हरतऱ्हेचे प्रयत्न केले. 
त्याला राजकीय मदत देण्यासाठी भारत सरकारने 96 वेळा पाकिस्तानशी संवाद साधला.
भारत सरकारच्या प्रयत्नांना यश आलं आणि हमीद अन्सारीची सुटका करण्यात आली.
आपला मुलगा भारतात परतल्याचा आनंद अनावर झालेल्या आई फौजिया यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *