Thu. Jul 9th, 2020

जगातील सर्वात लठ्ठ महिलेचे निधन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जगातील सगळ्यात वजनदार, लठ्ठ महिला म्हणून ख्याती असलेल्या इमान अहमदचा अबुधाबी येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. वजन कमी करण्यासाठीच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

हृदयविकार आणि किडनी निकामी झाल्याने इमानचा मृत्यू झाल्याचे बुर्जिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

गेल्याच आठवड्यात तिचा 37 वा वाढदिवस साजरा झाला होता.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 504 किलो वजनाची इमान बॅरिएट्रिक सर्जरीसाठी मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. सर्जरी आणि अन्य उपचारांमुळे तिच वजन तीन महिन्यांत जवळपास 300 किलोंनी घटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *