Thu. Jun 17th, 2021

मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईत देखील आज पावसाचा जोर दिसला आहे. मुंबईत गेल्या काही तासांपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस कोसळत असून, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची धुमाकूळ उडवली आहे. पावसामुळे लोकल सेवेलाही ब्रेक लागला आहे. तसेच मुंबईत पाऊस हा संततधार सुरू असल्यानं मुंबईच वातावरण फार थंड झालं आहे. तर पुढील चार दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. तसा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *