दूध दरात तातडीनं वाढ आणि दुधाला एफ.आर.पी. मिळणार

दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी किसान सभा, शेतकरी संघटना आणि दूध संघांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. टाळेबंदी पूर्वी मिळत असलेले दर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी दूध खरेदी दर वाढविण्यात येतील आणि पुन्हा असे संकट शेतकऱ्यांवर कोसळू नये यासाठी उसा प्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. लागू करणारा कायदा केला जाणार आहे. हा कायदा सहकारी आणि खासगी दूध संघ आणि कंपन्यांना लागू होणार असा तोडगा यावेळी बैठकीत काढण्यात आला आहे.
राज्यातील अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य, एक ब्रँड धोरण स्वीकारा या मागण्या यावेळी दूध उत्पादकांनी लावून धरल्या आहेत. ऊसाप्रमाणे दुधालाही रेव्हेन्यू शेअरींचे धोरण लागू करण्याबाबत मात्र बैठकीत सर्वसंमती झाली नाही. रेव्हेन्यू शेअरिंग बाबत अधिक अभ्यास करण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती यावेळी मंत्री सुनील केदार यांनी केली आहे.