Fri. Oct 7th, 2022

‘लालबागचा राजा’चे वीस तासांनी विसर्जन

अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेला मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला २० तासांच्या मिरवणुकीनंतर भावपूर्ण निरोप दिला. सकाळी 9 वाजेच्या सुमारास राजाचं समुद्रात विसर्जन करण्यात आलं आहे.

ही शान कुणाची, लालबागच्या राजाची…असं म्हणत लालबागच्या राजाची शाही मिरवणूक निघाली. ही मिरवणूक शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मार्गस्थ झाली होती. जवळपास २० तास ही मिरवणूक चालू होती. शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकतो. कित्येक तास राजाच्या मागे उभे राहून आणि शेकडो भक्तांचा जनसागर घेऊन ही मिरवणूक हळू-हळू पुढे सरकत गेली.

लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर उत्तर आरती करण्यात आली. कोळी बांधवांनी बोटींवरून सलामीही दिली. त्यानंतर विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात कोळी बांधवांनी विसर्जन केलं. लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील गणपतीचं विसर्जन संपूर्ण झाल्याचं मानलं जातं.

निरोप घेतो देवा आता..आज्ञा असावी…चुकले असेल काही तर माफी असावी…असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले…

कसे झाले लालबागच्या राजाचे विसर्जन पाहुयात…

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.