Fri. Aug 12th, 2022

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतातील स्टील उत्पादनावर

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. या युद्धामुळे भारतातील स्टील उत्पादन दरात मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले. रशिया-युक्रेन युद्धामुळे चार दिवसांपूर्वी ५५ हजार रुपये प्रति टन असलेले स्टील आता ६९ हजार ते ७० हजार प्रतिटनवर पोहचले आहे. रशिया-युक्रेन युद्धामळे स्टीलच्या दरात वाढ झाली आहे.

युक्रेन हा मॅगनीज तसेच लोह खनिजाचा निर्यातदार आहे. तर युरोपमध्ये या खनिजांची प्रामुख्याने निर्यात होते. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे या खनिजाचा तुटवडा निर्माण झाला असून या खनिजांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच कोळसा आणि स्टीलसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात केला जातो. मात्र, या युद्धामुळे कच्चा मालाच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, स्टीलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे स्टील उत्पादकांचा खर्च वाढला आहे.

स्टीलच्या दरात वाढ झाल्यामुळे बांधकाम खर्चामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर रशिया-युक्रेन युद्ध थांबले तरीही स्टीलचा भाव कमी होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता बांधकाम खर्चात वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.