Sun. Aug 18th, 2019

आज वसुबारस, गोमातेच्या पुजेने दिवाळीची सुरुवात

0Shares

दिवाळीत एकादशीपासूनच सणाची सुरुवात होते, आज 4 नोव्हेंबर रोजी गोवत्स द्वादशी हा सण आहे. महाराष्ट्रात या सणाला दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या सणाला वसुबारस म्हटले जाते. पारंपरिक हिंदू तिथीनुसार अश्विन महिन्यामध्ये धनत्रयोदशीच्या आधी आणि कृष्ण पक्षाच्या 12 व्या दिवशी (द्वादशी) गोवत्स द्वादशी साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी गाईची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून ही पूजा केली जाते. तसेच यादिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याण्यासाठी उपवासही करतात. 

वसुबारस (गोवत्स द्वादशी) पुजेची वेळ 

सकाळी 6 ते रात्री 8:32 वाजता

वसुबारस (गोवत्स द्वादशी) पुजा विधी

  • या दिवशी गायींना अंघोळ घातली जाते, त्यानंतर गायींना सजवले जाते.
  • जर तुमच्याकडे गायी नसतील तर तुम्ही गायीच्या मूर्तीचीही पूजा करु शकता.
  • संध्याकाळी गाईची आरती केली जाते, त्यानंतर गायीला नैवेद्य अर्पण केले जाते.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *