Mon. May 10th, 2021

PulawamaTerrorAttack : महत्त्वाचे पुरावे हाती!

पुलवामा दहशतवादी हल्याचा तपास करणाऱ्या NIAच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत. यामध्ये हल्ल्यापूर्वीचं CCTV फुटेज NIA ला मिळालं आहे. हल्ल्यात मारुती इको कारचा वापर करण्यात आला होता. या कारचा मालक सज्जाद भटची याची ओळख पटली आहे. पुलवामा हल्यानंतर सज्जाद बेपत्ता झालाय. सज्जादच्या अटकेसाठी आता चौकशी यंत्रणा कसून मागे लागली आहे. हल्ला झाल्याच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या गावात सज्जाद भट राहतो. CCTV फुटेजद्वारे या कारची ओळख पटविण्यात आली.

CCTV फुटेजमध्ये आदिल अहमद डार कार चालवतांना दिसतोय.

NIA च्या माहितीनुसार ही इको कार २०१०- २०११चं मॉडेल आहे.

या कारला पुन्हा पेंट करण्यात आलं होतं.

घटनास्थळी या कारचे shock absorbers मिळालेत.

या shock absorbers च्या साह्यानं ही कार केव्हाची आहे, त्याचा शोध फोरेन्सिक टीमने लावलाय.

दुसरीकडे जैश-ऐ-मोहम्मदच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा आवाज कुणाचा आहे, याचा तपास आता सुरु आहे.

NIA टीमने घटनास्थळावरुन एक कॅन जप्त केलाय.

यात 30 किलो RDX ठेवलं होतं.

हे कुठून आणलं याचा तपास आता सुरू आहे.

 

तपासात मिळाले महत्वाचे पुरावे

 

१. हल्यात इको कारचा वापर झाल्याचं स्पष्ट

 

२.  कारचे शॉक ऑब्जर्वर सापडले, त्या माध्यमातून गाडीचं मॉडेल स्पष्ट

 

३. कारचा मालक सज्जाद भटची ओळख पटली

 

३. सज्जाद पुलवामा हल्याच्या दिवसापासून फरार, अटकेसाठी शोध सुरु

 

४. CCTV च्या माध्यमातून अहमद डार याच्याव्यतिरिक्त कारमध्ये अजून कोण होत याचा तपास सुरु

 

५. घटनास्थळावरुन ३० किलो RDX चा एक कॅन जप्त, स्फोटकं कुठून आलेत याचा शोध

संबंधित बातम्या-

#PulwamaTerrorAttack : ‘या’ दहशतवाद्यामुळे 44 जवान शहीद

#PulwamaTerrorAttack : हल्ल्याचा बदला व्याजासकट घेणार – पंतप्रधान मोदी

#PulwamaTerrorAttack : शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार – सीआरपीएफ

#PulwamaTerrorAttack: जवान तुझे सलाम

#PulwamaTerrorAttack : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pulwama Attack: भारत पाकविरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत – डोनाल्ड ट्रम्प  

#PulwamaTerrorAttack – पाकिस्तान म्हणे भारतानेच केला हल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *