Tue. Sep 27th, 2022

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

  राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना म्युकर मायकोसिसचे रुग्णही नियंत्रणात आले आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले असून यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. तसेच बाजारपेठेंमध्ये ग्राहकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी भान ठेवून सामाजितक अंतराची अट मान्य करत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालनामध्ये दिले आहेत.

  दिवाळी काळात गर्दी केल्याने तसेच नियम न पाळल्याने पुन्हा कोरोना वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करत दिवाळी साजरी करण्याचे तसेच पर्यावरण विभागाने काढलेल्या अधिसूचनेचे पालन करत फटाके फोडण्याचे आवाहन राजेश टोपेंनी दिले आहे. राज्यात ७५ लाख नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लसीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी लस घेण्याचे आवाहनही त्यांनी दिले आहेत. राज्यात डेंग्यू, चिकन गूनियाचे रुग्ण सक्रिय होत आहेत. तसेच डेंग्यू रुग्णांमध्ये काही प्रमाणात डेल्टा प्लसची लक्षणे आढळत आहेत त्यामुळे आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात असल्याचेही टोपेंनी सांगितले आहे.

 हे  सुद्धा वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीला शरण

  कोरोना लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्यांना १५ दिवसांनंतर रेल्वेन प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकिट मिळणार आहे. मात्र रेल्वेच्या जनरल बोगीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना रेल्वे तिकीट देता येणार नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून नाराजीचा सूर येत आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाकडून  रेल्वेकडे विनंती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.