Mon. Aug 19th, 2019

पुरासंदर्भातील बातम्या पाहताय? या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या…

0Shares

महाराष्ट्रातील पुराच्या बातम्या पाहतानाच धरणे भरल्याच्या आणि धरणातून पाणी सोडल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र यामध्ये वापरले गेलेले क्युसेकसारखे शब्द, एककं समजून घेणं महत्त्वाचं आहे. क्युसेक, क्युमेक, पूर रेषा या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

क्युसेक (Cusec) म्हणजे काय?

धरणातून सोडण्यात येणारं पाणी क्युसेकमध्ये मोजतात.

क्युसेक म्हणजे एक घनफूट पर सेकंद

एक क्युसेक पाणी म्हणजे सेंकदाला 28.31 लिटर पाणी सोडणं.

क्युमेक (Cumec) म्हणजे काय ?

क्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजतात,  क्युमेकमध्ये पाणी घनमीटर मध्ये मोजतात

एक क्युमेक- प्रती सेकंदाला 1000 लिटर्स पाणी सोडणे

टीएमसी (TMC) म्हणजे काय?

धरणाची क्षमता टीएमसी मध्ये मोजली जाते

1000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी ( 1 अब्ज घनफूट )

पूर रेषा म्हणजे काय ?

पांढरी रेषा  –

धरणातून 30,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं असता त्या नदी पात्राची पाणीपातळी जेथे पोहचेल ती रेषा पांढरी रेषा (White Line) म्हणून ओळखली जाते.

निळी रेषा –

धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं. पांढरी रेषा ओलांडून पाणी पुढे जातं. ती रेषा म्हणजे निळी रेषा (Blue Line)

लाल रेषा-

अतिवृष्टीच्या परिस्थितीत धरणातून 1 लाख क्युसेक पाणी सोडलं जातं. निळी रेषा ओलांडून पाणी जिथे पोहचतं. त्याला लाल रेषा (Red Line) म्हणतात.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *