Mon. Dec 6th, 2021

कोरोनामुळे पाकिस्तानवर उपासमारीची वेळ, इम्रान खानने पसरले जगापुढे हात

कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशात राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आली आहे. विविध देशांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तोदेखील वाढण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानातही लॉकडाऊनची परिस्थिती आहे. मात्र देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या भीतीने तेथे अजूनही पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. मात्र पाकिस्तानात परिस्थिती अजूनही बिकट आहे. त्यामुळे अखेर पाकिस्तानने इतर राष्ट्रांकडे हात पसरले आहेत.

पाकिस्तानने सार्ककडे मदत माहितली आहे. मात्र तेवढ्यावरच अवलंबून न राहता पाकिस्तानने आता जागतिक समुदायाकडेही आर्थिक मदत मागितली आहे. आम्हाला मदत करा नाहीतर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय  वित्तीय संस्था, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय समुदाय या सर्वांना त्यांनी आवाहन केलं आहे. कोरोनामुळे पाकिस्तानवर संकट आलं आहे. अशावेळी पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी एखादी मोहीम आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विकसनशील देशांचं कर्ज माफ करण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्याच्या आडून पाकिस्तानवरचं कर्ज माफ करण्याचा प्रयत्न इम्रान खान करत असल्याचा आरोप होतोय.

पाकिस्तानला आर्थिक मदतीची गरज आहे. पाकिस्तानात लोक उपासमारीने मरण्याची भीती इम्रान खान यांनी व्यक्त करत यापूर्वी सार्ककडे मदत मागितली. त्यानंतर आता जागतिक समुहाकडे पाकिस्तानने हात पसरत मदतीची याचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *