Fri. Sep 24th, 2021

‘पंतप्रधान इम्रान खान’ बावळट, हीना रब्बानी यांची टीका

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 भारताने रद्द केल्याने पाकिस्तान धुसफुसत आहे. पाकिस्तानचं इम्रान खान सरकार भारताची कोंडी करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही वारंवार तोंडावर आपटतंय. पाकिस्तानला कोणत्याही देशाने पाठींबा जाहीर केलेला नाही  आता तर पाकिस्तानातील विरोधी पक्षांनीही इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी-खार यांनी तर थेट ‘पंतप्रधान इम्रान खान बावळट आहे’ असं म्हटलंय. रब्बानी यांच्या या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये कलम 370 रद्द करण्याबाबत पाकिस्तानची बाजू इतर देशासमोर मांडण्यात इम्रान खान सरकार अयशस्वी झाले आहेत, अशी टीका हीना रब्बानी-खार यांनी केली.

तुम्ही बावळट असाल तर तुम्हाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

तुम्ही जाऊन प्रशिक्षण घेणं गरजेचे आहे,

अशा शब्दात हीना रब्बानी-खार यांनी पंतप्रधानांना सुनावलंय.

नागिरकांनी तुम्हाला निवडून दिलंय, त्यांना तुम्ही निराश करु नका.

तुम्हाला तुमचं काम माहीत नाही का ?  असा सवालही हीना यांनी इम्रान खान यांना  संसदेच्या भाषणात विचारलाय. इम्रान खान यांनी पाकिस्तानला जगभरात विनोदाचा विषय करून ठेवलं असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पाकिस्तानी सरकार फक्त भारताला विरोध करत आहे. कृती काहीच करत नाही. पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या निषेधाचा काहीच फायदा झालेला दिसत नाही असे ही विरेधी पक्ष टीका करत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *