Sat. Nov 27th, 2021

‘भारताला धडा शिकवायची वेळ आली आहे’, इम्रान खानची दर्पोक्ती!

“आता भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात गरळ ओकली.

मुझ्झफराबाद या ठिकाणी इम्रान खान यांनी भाषण केलं.

या भाषणात इम्रान खान यांनी भाजपा, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले इम्रान खान!

काश्मीरमध्ये Article 370 रद्द करण्याचा निर्णय भारताला महागात पडणार आहे.

RSS ची विचारधारा किती भीषण आहे, हे लोकांना माहीत नाही.

या संघटनेचा जन्म हिटलरच्या विचारधारेतून झालाय.

ते मुस्लिमांबद्दल लोकांच्या मनात द्वेष निर्माण करतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे बाटलीतून बाहेर आलेला राक्षस आहे.

काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मिरी मुलींबद्दल कशा प्रकारची शेरेबाजी भारतातून होत आहे ते पाहिलं, की त्यांचे विचार किती घाणेरडे आहेत हे समजतं.

महात्मा गांधींची हत्या याच विचारसरणीच्या लोकांनी केली.

भाजप सरकारमुळे भारताचं अतोनात नुकसान होणार आहे.

मोदी सरकारने देशातील संविधान नष्ट केली. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केला.

कलम 370 रद्द करण्याचा मोदींचा निर्णय हे संघाच्याच विचारधारेचा परिपाक आहे. मात्र पाकिस्तानचं लष्कर तयार आहे. युद्धासाठी पाकिस्तान सज्ज आहे. या युद्धाला भारतच जबाबदार असेल, असं इम्रान खान यांनी भाषणात म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *