Thu. Jan 27th, 2022

इम्रान खान यांनी मोदींना फोनकरून दिल्या शुभेच्छा

23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून जनतेने पुन्हा एकदा भाजपा सरकारला पसंत केले आहे. भाजपा सरकार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असून 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. पुन्हा भाजपा सरकार आल्यामुळे अनेकांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले इम्रान खान ?

पंतप्रधान पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 30 मे रोजी शपथ घेणार आहेत.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींना अभिनंदन केले.

मोदींबरोबर पुन्हा काम करण्याची संधी आणि इच्छा मिळणार असल्याचे इम्रान खान म्हणाले.

तसेच देशात शांतता, हिंसामुक्त,  दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकमुळे पाक आणि भारतात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन्ही देशात तणावाचे प्रमाण वाढत असल्यामुळे युद्ध होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

एअरस्ट्राइकनंतर पहिल्यांदा मोदी आणि इम्रान खानमध्ये फोनवर बातचीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *