Wed. Jun 23rd, 2021

औरंगाबादमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर

औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. 1400 एम एम ची मुख्य जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलं असून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचं बोललं जात आहे.

जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

औरंगाबाद शहरातील जय टॉवर भागांमध्ये रात्री बारानंतर मुख्य पाईपलाईन फुटली. यांमुळे तेथील रस्त्याने नदीचे रुप घतले होते. रस्त्यावर सर्वत्र पाणी पाणी झालं आहे. यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे.

औरंगाबादला चार दिवसाआड पाणी येते ,तेही पुरेसे येत नाही. मात्र दुसरीकडे हे अशा प्रकारे पाण्याची नासाडी होते. रात्री उशिरापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी येथे पोहोचलेले नव्हते. हे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती आणि पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

1400 एम एम ची मुख्य जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलं असून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *