Wed. Oct 27th, 2021

औरंगाबाद जळीतकांड : अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी

औरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडातील महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. जळीतकांडातील महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला.  

या महिलेवर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. या आगीमध्ये ही महिला ९५ टक्के भाजली होती.

या प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष मोहितेला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीला १० फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.

घटनाक्रम

२ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता संतोष मोहिते हा पीडितेच्या घरी एकटी असताना गेला. यादरम्यान या दोघांमध्ये वाद झाला. यावेळेस संतोषने या महिलेला मारहाण केली.

तसेच या महिलेवर रॉकेल टाकून पेटवलं. पेटवून घराची कडी लावून पळून गेला. दरम्यान या महिलेने आरडाओरडा  केल्यानंतर शेजाऱ्यांनी मदत केली. तसेच रुग्णालयात दाखल केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *