Sun. Sep 19th, 2021

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानकडून ‘बेली डान्स’!

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस गरिब होत चालली आहे. यावर तोडगा म्हणून अजरबैजान येथे पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (SCCI) एका गुंतवणूक शिखर संमेलनाचे आयोजन केले होते.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस गरिब होत चालली आहे. यावर तोडगा म्हणून ‘अझर बैजान’ येथे पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (SCCI) एका गुंतवणूक शिखर संमेलनाचं आयोजन केलं होतं. दरम्यान या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. यात बेली डांसर्सचा डांन्स गुंतवणूकदारांचे मनोरंजन करण्यासाठी ठेवला आहे. असे यातून दिसत आहे.

अजरबैजानची राजधानी बाकू येथील खैबर पख्तूनख्वामध्ये चार ते आठ सप्टेंबर या दरम्यान या शिखर संमेलन भरले होते. यामध्ये गुंतवणूकीसाठी आलेल्या गुंतवणूकदारांसमोर बेली डांसर्स नाचवल्या गेल्या, तसेच त्यातील काही गुंतवणूकदार त्या बेली डांसर्सचे फोटो काढत होते. असे पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी यांनी सांगितले.

पाकिस्तान त्यांच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. पाकीस्तानचा 2019 मध्ये वार्षिक तोटा 8.9 टक्क्यांवर आला आहे. त्यामूळे पाकीस्तानने विविध गोष्टीं खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. यांमध्ये प्रामुख्याने नवीन गाडी खरेदीवर बंदी घातली आहे. तसेच अनेक नोकऱ्यांवरही याचा परिणाम दिसून येत आहे.  मागील तीन दशकातील हा सर्वात मोठा तोटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *