Wed. Oct 5th, 2022

अन् तो आत्महत्या करण्यास निघाला…

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

आपल्या आयुष्यात असलेलं प्रेम आपल्यापासून दुरावणार तर नाही ना ?, आपला प्रियकर किंवा प्रेयसी नेहमी आपल्यासोबत असावी असं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतं.

मात्र आपलं प्रेम आपल्या डोळ्यासमोर आपल्या पासून लांब जात असेल तर एखादी व्यक्ती काय करेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण जळगावमधल्या एका तरूणाने दाखवून दिले आहे.

गणेश पवार असं या तरूणाचे नाव असून आपल्या वाढदिवसाला आपली प्रेयसी दुसऱ्या सोबत बोलताना आढळून आल्याने या तरुणाने बिग बाजारच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मात्र पोलिसांनी रेस्क्यू करून या तरुणाला खाली उतरविण्यात यश मिळविल्याने या तरुणाचा जीव वाचला आहे, तसेच या तरूणाला वाचवण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली.

या प्रकरणात नेमकं काय घडलं

  • जळगाव शहरातील खान्देश मिल सेंट्रल मॉल परिसरातील बिग बझार येथे काम करीत असलेल्या एका तरुणीशी गणेश पवार नामक तरुणाचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत.
  • मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर तरुणी गणेश पवारला पूर्वीप्रमाणे प्रतिसाद देत नव्हती.
  • त्यामुळे तरुणीचे इतर कोणासोबत प्रेम संबंध जुळल्याचा गणेशला संशय आला होता.
  • सोमवारी त्याचा वाढदिवस असल्याने सदर तरुणीला भेटायला तो बिग बझार येथे गेला.
  • मात्र सदर तरुणी त्याला एका तरुणासोबत बोलताना दिसली या तरुणाशी देखील या तरुणीचे प्रेम संबंध आहेत अशी माहिती त्याला मिळाली.
  • त्यानंतर गणेश पवारने सदर तरुणीला आत्महत्येची धमकी देत बिग बझारच्या तिसऱ्या मजल्यावर चढून शोले स्टाईलमध्ये आपल्याशी पूर्वी प्रमाणे प्रेम संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली.
  • सदर घटनेची माहिती मिळताचं पोलीस वेळीचं घटना स्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी गणेश पवारला बोलण्यात गुंतवून ठेवत नंतर त्याला झडप घालून ताब्यात घेत त्याचा जीव वाचविण्यात यश मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.