Tue. Jun 28th, 2022

Corona : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ, रुग्णांची संख्या ११२वर

कोरोना विषाणूचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पण तरीही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ताज्या आकडेवारीनुसार ११२वर पोहचला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये कोरोनाचे ५रुग्ण आढळले. एका कुटुंबामधील ५ लोकं ४ कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आले. यामुळे कोरोनाची लागण झाल्याची महिती मिळत आहे. या सर्वांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणीमध्ये या रुग्णांना पॉझीटीव्ह असल्याचं समजलं. त्यामुळे हा आकडा ११२वर पोहचला.

कोरोनासंदर्भात एकीकडे नकारात्मक बातम्या येत आहेत. मात्र एक दिलासादायक बातमी आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील २ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी देशात पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलं. त्यामुळे आजपासून ( २५ मार्च ) ते १६ एप्रिलपर्यंत असणार आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुचां पुरवठा सुरु राहणार आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची शहरनिहाय संख्या

मुंबई – 41
वसई विरार – 1
ठाणे – 3
कल्याण – 5
उल्हासनगर – 1
नवी मुंबई – 5
पनवेल – 1
रत्नागिरी – 1
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 9
सातारा – 2
अहमदनगर – 3
औरंगाबाद – 1
नागपूर – 4
यवतमाळ – 4

एकूण 112

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.