Mon. Aug 15th, 2022

महिला शिवसैनिक, शहर प्रमुखात राडा

भाईंदर शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी शिवसेना शाखेतच दिसला आहे. शिवीगाळ केल्यावरू महिला शिवसैनिकांने शहर प्रमुखास मारले आणि काळे फासले. यामध्ये शिवसैनिकही जखमी झाली आहे. याप्रकरणी शिवसैनिक आणि शिवसेना शहरप्रमुख यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे प्रकरण?

रविवारी दुपारी माजी शहर संघटक वेदाली परळकर या महिला बचत गटाबाबत काही महिलांना घेऊन शिवसेना शाखेत गेल्या होत्या. भाईंदर पोलीस ठाण्यासमोर ही शिवसेनेची शाखा आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख पप्पू भिसे खुर्चीवरून उठून बाहेर गेले असता, वेदाली परळकर या त्या खुर्चीवर बसल्या. वेदाली या खुर्चित बसल्यामुळे भिसे यांनी वेदाली यांना शिवीगाळ सुरू केली. यावेळी भिसे यांनी वेदाली यांना घाणेरड्या शिव्या दिल्या असून खुर्चीवर बसण्याचा जाब विचारला. हे भांडण थेट हातघाईवर गेले. वेदाली आणि अन्य महिलांनी भिसे यांना मारायला सुरूवात केली. या हाणामारीत वेदाली यांच्या हातावर जखमा झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात तत्काळ उपचार करण्यात आले.

याप्रकरणी, शिवेसैनिक वेदाली परळकर आणि शहरप्रमुख पप्पू भिसे यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, वेदाली यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी भिसे यांच्यावर विनयभंगासह मारहाण आणि जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच भिसे यांनी वेदाली यांच्याह अन्य महिलांवर मिळून मारल्याची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.