Thu. Sep 29th, 2022

नागपुरात १५ संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू

राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. दरम्यान नागपुरमधील १५ संपकारी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत तर दुसरीकडे वारंवार आवाहन करूनही कामावर परत येत नसलेल्या एसटी कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर एसटी महामंडळाकडून १५ संपकारी एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ११६ संपकारी एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. तर एसटी महामंडळाकडून १३ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागपूर विभागातील बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांची संख्या १२१ झाली आहे.

एसटी महामंडळाचे विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाका आणि कामावर पुन्हा रुजू व्हा, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान केले. तसेच कृती समितीच्या बैठकितही कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र संपकारी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून जोवर एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही, तोवर संप सुरूच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

1 thought on “नागपुरात १५ संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.