Mon. May 27th, 2019

चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार पुण्यामध्ये  घडला आहे.

पुण्यातील नऱ्हे परिसरात ही घटना घडली आहे. सोनाली आनंदराव भिंगारदिवे असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे.

सोनाली अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती.

ती मागील चार दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती.

या हत्येनंतर मी ही आत्महत्या करतो अशी चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झाला आहे.

कशी झाली हत्या?

सोनाली आणि सोमेश घोडके हे दोघेही मूळचे साताऱ्यामधील आहेत.

गेल्या काही दिवासांपासून  सोनाली आणि सोमेश घोडके यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू होते.

सोमेशने नऱ्हेमधील झील कॉलेजच्या जवळ भाड्याने खोली घेतली होती.

गेल्या काही दिवसांपासून दोघेही या खोलीत एकत्र राहत होते.

सामेशला सोनालीचे इतर मुलाशी संबंध आसल्याचा संशय आला होता.

सोमेशने चारित्र्याच्या संशयावरून सोनालीचा गळा आवळून खून केला.

सोमेश सध्या फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.

चार दिवासांनंतर मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली.

आणि सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तीन-चार दिवसांपूर्वी सोनालीची हत्या झाल्याचा अंदाज आहे.

सोमेश सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *