Wed. Aug 21st, 2019

नाशिकमध्ये सापडला मानवी हाडांचा सापळा

0Shares

नाशिकच्या पंचवटीत पेठरोड कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत मानवी हाडांचा सापळा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डोक्याची कवडी,पायाचे दोन भाग विविध ठिकाणी आढळून आले असून हा मृतदेह अज्ञात पुरूषाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मानवी सापळा विहिरीत सापडल्याची घटना नुकतीच पुण्यात उघडकीस आली होती त्यानंतरची ही दुसरी घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकमधील पंचवटीत पेठरोड कार्यालयाजवळ मानवी हाडांचा सापळा सापडला आहे.

मात्र या हाडांच्या सापळ्याची ओळख पटली नसून शोध सुरू आहे.

म्हसरूळ पोलिस स्थानकाची भिंत आणि आरटीओच्या मधल्या तोडलेल्या दगडी भिंती नजीक हा सापळा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सापडलेला सापळा हा अज्ञात पुरूषाचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कवटी, पायाचे दोन भाग अशा अवस्थेतील हा सापळा विविध ठिकाणी सापडला आहे.

भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून विल्हेवाट लावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *