Wed. May 19th, 2021

नाशिकमध्ये महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये जळीतकांड प्रकार घडलं आहे. महिलेला भर एसटी डेपोमध्ये पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  यामध्ये ही महिला ४० टक्के भाजली आहे.

या महिलेला लासलगावमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे.

शनिवारी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. चार ते पाच तरुणांनी या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.  यानंतर या आरोप्यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली.

तसेच हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचं सांगितलं जात आहे.

या सर्व प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या पाच तरुणांपैकी एकाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी हिंगणघाटमधील प्राध्यापिका असलेल्या तरुणीचा जळीतकांडात मृत्यू झाला होता. हिंगणघाटमधीत तरुणीची सात दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती.            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *