Sat. May 25th, 2019

कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याने संगणक अभियंत्याचा खून

81Shares

पुण्यात संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. मंजित प्रसाद असं या मृत तरुणाचे नाव आहे.तो पुण्यातील आयटी पार्क मध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करत होता. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डीलक्स चौकात त्यांच्यावर धारदार शस्त्रांने वार करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

हत्येचं नेमकं कारण काय ?

मंजित प्रसाद विमान नगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करत होते.

नेहमी प्रमाणे मंजित आणि  अनेक ऍम्प्लॉईज  कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते.

पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवून  बस थांबविली.

बस चालकाशेजारी बसलेल्या मंजित त्यानी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली.

कानाखाली मारल्याचा जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा गुंडानी मंजित यांना लथाबुक्यांनी मारायला सुरुवात तर काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले.

सर्व कर्मचारी एकत्र गुंडांच्या दिशेने धावल्याने गुंड पळून गेले. मंजित यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

उपचारादरम्यान मंजित यांचा काही तासांनी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

 

कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हणून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *