Wed. Oct 27th, 2021

पुण्यात लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा

पुणे तिथे काय उणे याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आला आहे. पुणेकर काय करतील याची चर्चा सगळीकडेच असते.

पुण्यातील एरंडवण्यात राहणाऱ्या कपिल पटवर्धन यांनी त्यांच्या कुत्र्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. कपिल पटवर्धन यांच्या कुत्र्याचं कायझर असं नाव आहे.

कायझरचा पहिला वाढदिवस त्याच्या मित्रांसोबतच साजरा केला.

कायझरचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला. कायझरच्या वाढदिवसानिमित्त कायझरच्या मित्रांना पूल पार्टी देण्यात आली.

कायझरच्या मित्रांनी स्विमिंग पुलमध्ये उड्या मारत कायझरच्या वाढदिवसाचा आनंद लुटला.

कायझर सोबत आणखी २ जण राहतात. कायझर रोज सकाळी पर्वती चालायला जातो. त्याठिकाणी त्याची आणखी काही मित्राशी ओळख झाली. हेच सर्व मित्र कायझरच्या वाढदिवसाला हजर होते.

केक कापला, पार्टी झाली. पटवर्धन कुटूंबाने हे क्षण अगदी आनंदाने साजरे केलेत.

मुक्या प्राण्यांवर जीव लावणारे अनेक जण आहेत. मात्र पटवर्धन कुटूंबान एका मुक्या प्राण्याचा वाढदिवस असा साजरा केला की त्याची चर्चा सगळीकडेच होऊ लागली.

पटवर्धन कुटूंबाला वर्षभरापूर्वी कायझर रस्त्यावर भेटला होता. तेव्हापासून पटवर्धन कुटुंबीय कायझरची कुटूंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *