Wed. Aug 4th, 2021

राजस्थानमध्ये वादळी पावसामुळे मोठा अपघात; 18 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील बाडमेर येथे वादळी पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना वादळी पाऊस पडला. या वादळी पावसामुळे मंडप कोसळला आणि 18 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

राजस्थानच्या बाडमेरमध्ये वादळी पाऊस झाल्यामुळे मंडप कोसळ्याची घटना घडली.

जिल्ह्यातील एका गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना वादळी पाऊस पडला.

या अपघातात 18 जण मृत्यूमुखी पडले असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

गंभीर जखमींना नहाटा रुग्णालयात दाखल केले असून जसोल गावात ही दुर्घटना घडली आहे.

मंडप कोसळला तसेच वीज पुरवठा सुरू असल्यामुळे लोकांना शॉत लागून मृत्यू झाल्याचे समजते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *