Mon. Jul 22nd, 2019

चंद्राबाबू नायडूंना धक्का, चार खासदारांचा राजीनामा

0Shares

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. पक्षाच्या सहा पैकी चार राज्यसभा सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण भाजपमध्ये सहभागी होणार आहे. या चारही राज्यसभा सदस्यांनी राज्यसभेचे सभापती वैकैंया नायडू यांची भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा दिला. आमच्या पक्षाला कमजोर करण्याचा भाजपचा डाव आहे. आम्ही संघर्ष करत राहू अस तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्रांबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

तेलुगू देसम पक्षामध्ये फूट

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षामध्ये फूट पडली आहे.

पक्षाच्या सहा पैकी चार राज्यसभा सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाचं विधीमंडळ सदस्य मंडळ भाजपमध्ये विसर्जीत कऱण्याची मागणी या चार खासदारांनी केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होवून आम्ही पक्ष सोडतोय असंही या सदस्यांनी सांगीतलं

खासदार टीजी वेंकटेश, वाईएस चौधरी, जीएम राव आणि एम रमेश या चार खासदांरानी राजीनामा दिलाय.

दरम्यान राज्याच्या कल्याणासाठी आमचा लढा होता. मात्र आमच्या पक्षाला कमजोर करण्याचा भाजपचा डाव आहे.

आम्ही संघर्ष करत राहू अस तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्रांबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: