Fri. Jun 21st, 2019

गौरव ‘महार रेजिमेंट’चा…

0Shares

अतुलनीय शौर्याच्या बळावर देशाच्या संरक्षणासाठी महान कामगिरी करणाऱ्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे आज पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले होते. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळविली.

महार रेजिमेंटने ९ युद्धक्षेत्र सन्मान आणि १२ रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच १ परमवीर चक्र, १ अशोक चक्र, ९ परम विशिष्ट सेना पदक, ४ महावीरचक्र, ४ कीर्तीचक्र, १ पद्मश्री, ३ उत्तम युद्ध सेवा पदक, १६ अतिविशिष्ट सेवा पदक, ३० वीरचक्र, ३९ शौर्यचक्र पदक, २२० सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने दोन चीफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच दोन आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: