राष्ट्रवादीचे खासदार नथुराम गोडसेंच्या भूमिकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच नथुराम गोडसेट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यांच्या या चित्रपटावरून अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे वाद होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदर्शित होणार आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. मात्र, या चित्रपटावरून वाद होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर काही नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नथुराम गोडसेंची भूमिका साकारण्यासाठी राष्ट्रवादीकडून समर्थन करण्यात आले आहे. आणि त्याला काँग्रेसचे समर्थन लाभत आहे. तर शिवसेना मात्र या वादापासून स्वत:ला अलग ठेवू पाहतेय.
अमोल कोल्हे यांनी या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ भूमिका घेतली नाही. एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांशी संबध जोडणे या दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत. कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. कलाकार म्हणून मी भूमिका साकारली. व्यक्ती म्हणून मला वैचारिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्ही स्वातंत्र्याचा मी आदर करतो,’ असे ते म्हणाले.