Sun. Jan 16th, 2022

विधानसभेत भाजपा-शिवसेनेचा 50-50चा फॉर्म्युला

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सुद्धा एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विधानसभेत भाजपा आणि शिवसेना 50-50चा फॉर्म्युला वापरणार आहेत. 288 जागांपैकी भाजपा आणि शिवसेना 135 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

कसा असेल विधानसभा निवडणुकींचा 50-50 फॉर्म्युला ?

आगामी विधानसभा निवडणूका काही महिन्यातच असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपा- शिवसेना विधानसभा निवडणुकांसाठी सुद्धा युती कायम ठेवणार असल्याचे पक्ष नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे भाजपा-शिवसेना यंदा 50-50 फॉर्म्युलाचा वापर करणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

288 जागांपैकी दोन्ही पक्ष प्रत्येकी 135 जागांवर लढणार तर 18 जागा घटक पक्षांना देण्यात आल्या आहे.

औरंगाबादमध्ये दुष्काळी दौऱ्यावर गेले असताना पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *