Mon. Sep 27th, 2021

मध्य रेल्वेवरील एसी लोकलचा आज शुभारंभ

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वे मार्गावरही आज एसी लोकल सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर ही एसी लोकल उद्या शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

याएसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. या एसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या मार्गावर धावणार एसी लोकल

मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर ही एसी लोकल धावणार आहे.

ठाणे, वाशी, पनवेल मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचा आज ३० जानेवारीला शुभारंभ करण्यात येणार आहे.

या एसी लोकलचं सीएसएमटी स्थानकावर दुपारी २.३० वाजता रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगठी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.

तर रेल्वेमंत्री पियुष गोयल हे दिल्लीतून व्हिडिओ कॉनफरन्सिंगद्वारे या एसी लोकला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

ही एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत ३१ जानेवारीपासून दाखल होणार आहे. दिवासातून एकूण १६ फेऱ्या या एसी लोकलच्या होणार आहेत. सोमवार ते शुक्रवार अशा आठवड्यातील एकूण ५ दिवस ही रेल्वे सेवा असणार आहे.

ही एसी लोकल दररोज सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी पनवेलवरुन ठाण्याच्या दिशेने रवाना होईल. तर ठाण्यावरुन पनवेलच्या दिशेने शेवटची एसी रेल्वे रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सुटेल.

एसी लोकलमध्ये ‘या’ विशेष सुविधा

या एसी लोकलच्या प्रत्येक डब्ब्यात एसीसाठी माऊंटेट पॅकेज युनिट्स असणार आहे. तसेच संकटसमयी परिस्थितीसाठी टॉकबॅक यंत्रणेची सुविधा देण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे प्रवाशी थेट मोटरमॅन सोबत संवाद साधू शकतात.

या एसी लोकलमध्ये एकूण १२०८ प्रवाशांची बैठक व्यवस्था आहे. तर ४३६९ प्रवाशी उभे राहू शकतात.

महिला करणार एसी लोकलंच सारथ्य

मध्य रेल्वेवरील या पहिल्या एसी रेल्वेचं जबाबदारी महिलेच्या खांद्यावर असणार आहे. मनिषा म्हस्के या पहिल्या एसी लोकलचं सारथ्य करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *