देशातील कोरोनाची स्थिती चिंताजनक

संपूर्ण देश गेल्या एका वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या ही वाढतानाच दिसत आहे. देशात बुधवारी कोरोनामुळे ४१२० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृत्यूंचा आकडा हा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. तसेच ३ लाख ६२ हजार ७२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाख ०३ हजार ६६५ इतकी झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे.

चिंताजनक बाब म्हणजे मागील बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.

बुधवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तसेच, देशामध्ये आतापर्यंत एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

Exit mobile version