Sat. Jul 2nd, 2022

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यात वाढ

कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या (Increase in Corona Patient Population in Maharashtra ) आकड्यात वाढ झाली आहे. राज्यातला कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकड्यात ४ ने वाढ झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांचा आकडा हा ३७ इतका झाला आहे. यासंदर्भातील माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. तर देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १०० च्या पार गेला आहे. तर आतापर्यंत २ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

राज्यासह देशात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

अनेक नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. MPSC च्या परीक्षा देखील ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मुंबईत ३१ तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सरकारच्यावतीने केलं जात आहे.

दरम्यान पुण्यामध्ये कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.