Fri. May 20th, 2022

आजपासून लोकल फेऱ्या पूर्ववत

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणजे लोकल वर बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती . पण आता दुसरी लाट ओसरत असल्याचे लक्षात येताचं कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रोज मोठ्या अडणींचा सामना करत असलेल्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी लोकल च्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने आजपासून लोकल फे ऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे . दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. दरम्यान ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत (दुपारी ४ पर्यंत) लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ८८३ झाली आहे . मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवलीकर यात आघाडीवर आहेत. डोंबिवलीत एकूण ७ हजार ९१५ पासची, तर बोरिवलीत ४ हजार ७२ पासची विक्री झाली आहे .
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तशी तुरळक राहिली. सोमवारीही (पारसी नवीन वर्ष) सुट्टी असल्याने ही संख्या कमीच असेल, असा अंदाज रेल्वेकडून व्यक्त केला जात आहे. मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांचीही लोकल प्रवासात भर पडू शकते.

मध्य आणि पश्चिमरेल्वेवर सोमवारपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मध्यरेल्वे वर सोमवारपासून लोकलच्या १ हजार ६८६ फेऱ्या होणार आहेत. आतापर्यंत १ हजार ६१२ फेऱ्या सूरु होत्या. यामध्ये आता ७४ फेऱ्यांची वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.