Thu. Sep 16th, 2021

प्रेमभंग, विवाहबाह्य़ संबंधांमुळे राज्यात आत्महत्यांमध्ये वाढ

राज्यात कोरोनाकाळात खून, दरोडय़ासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट झालेली दिसत असताना दुसरीकडे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. यासंबंधित आकडेवारीवरून राज्यात प्रेमभंग आणि विवाहबाह्य संबंधांमध्येही मोठय़ा प्रमाणात वृद्धी झाल्याचे आणि त्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये प्रेमात दगा मिळाल्याने राज्यात ५३४ तरुण-तरुणींनी आत्महत्या केली होती. २०२० मध्ये प्रेमभंगामुळे ६६५ लोकांनी आत्महत्या केली. विवाहबाह्य़ संबंधांमुळे २०१९ मध्ये ९४ तर २०२० मध्ये १०४ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये झालेली ही वाढ समाजात प्रेमभंग व अनैतिक संबंधांत वाढल्याचे संकेत देणारी आहे. २०१९ मध्ये गरिबीमुळे राज्यात ३१५ लोकांनी आत्महत्या केली. २०२० मध्ये गरिबीच्या कारणामुळे ४७६ जणांनी टोकाचा निर्णय घेऊन जगाचा निरोप घेतला.

 

वर्ष     गरीबी     प्रेमभंग   विवाहबाह्य संबंध

२०१९   ३१५      ५३४          ९४

२०२०   ४७६     ६६५         १०४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *