Tue. Jun 28th, 2022

मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

अल्पसंख्यांक मंत्री मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डी कंपनीच्या सदस्यांची  बंधसं असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठीत आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली २३ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांच्या विरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली. त्यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

नवाब मलिक यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता, असेही न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड हडपण्यासाठी मनी लॉन्ड्रींग केल्याचं कट न्यायालयाने म्हटले आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या. मनी लाँड्रिंग केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायाधीश रोकडे यांनी असे निरीक्षण नोंदवले की या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत.

 नवाब मलिक यांना किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या खासगी रुग्णालयातील उपचाराच्या अर्जाला परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी नबाब मलिक यांना आर्थर रोड जेलमधून कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.