Mon. Mar 8th, 2021

पुण्यात सायबर गुन्ह्यांत वाढ, OLX वर शॉपिंग करण्यापूर्वी सावधान!

पुणे शहरात सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. नागरिकांना वेगवेगळे अमिष दाखवून फसवणूक केली जातेय.या फसवणुकीमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होताना दिसत आहे.

सायबर फसवणुकीत बरेचसे तरुण आमिषाला बळी पडताना दिसत आहे. विकी जोंधळे नावाच्या तरुणाच्या बँक अकाऊंटमधील पैसे अचानक निघून गेले. फोन पे नावाचे अँप त्याने घेतलं. मात्र त्याला काही समजण्याच्या आता ऐका फोन वरून त्याला त्याची माहिती मागवण्यात आली. त्याला काही कळण्याअगोदर त्याचे पैसे बँकेतून कट झाले.

खरंतर मोबाईलचा अतिवापर या सर्व फसवणुकीला कारणीभूत ठरल्या आहेत. आपल्या मोबाईलवर अनेक अनोळखी messages येतात. ते messages जेव्हा उघडून पाहिले जातात, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे आपली माहिती फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे जाते. ती माहिती बँकेची असेल किंवा आपल्या मोबाईलमधील माहिती सर्व काढून घेतली जाते. शहरात नोकरीसाठी, शिक्षणासाठी राज्यातून अनेक जण येत असतात. त्यामुळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नोकरी लावून देतो अशा गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे.

तसंच गेले काही दिवसात पुणे पोलिसाच्या सायबर शाखेकडे OLX वरून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसत आहे. यावर वेगवेगळ्या वस्तू टाकल्या जातात त्यावर माहिती पाहून लोक भूलतात आणि त्यांची फसवणूक होते.

2017 यावर्षी 3,500 गुन्हे संपूर्ण सायबर गुन्हे अंतर्गत घडले.

2018 यावर्षी 5,500 गुन्हे सायबर शाखेने नोंदवले

2019 यावर्षी आतापर्यत 2,800 च्यावर सायबर गुन्हे जाऊन पोहचले आहेत.

OLX वरील चोऱ्यांची संख्या 2018 मध्ये 225 एवढी होती.

OLX वर यावर्षी आतापर्यंत ३७५ गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सायबर गुन्ह्याची वाढती संख्या पाहून पुणे शहरातील नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक होत नाही याची काळजी नागरिकांनी घेण्याचं आवहान पोलीस करतायेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *