जुही चावलाच्या अडचणीत वाढ

बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाने जुही चावलाला ठोठावलेल्या २० लाख रुपये दंडाच्या वसुलीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
५जी तंत्रज्ञानाविरोधात खटला दाखल केल्यामुळे जुली चावलासह इतर दोघांना २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे दंड जमा करण्याचा निर्देश देणाऱ्या दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या याचिकेवर येत्या ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्या, उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
जुही चावला यांची याचिका कशासाठी?
दूरसंचार उद्योगातील ५जी योजनेविरोधात याचिका.
५जी योजनेमुळे माणूस आणि पशु पक्ष्यांवर विपरीत परिणाम होतील.
जुही चावला यांचा उच्च न्यायालयात दावा.
जुही चावला, वीरेश मलिक आणि टीना वाचानी यांनी दाखल केली होती याचिका.
२०२१मध्ये जून महिन्यात याचिका फेटाळली.
न्यायालयाने याचिकेला पब्लिसिटी स्टंट संबोधले.
We came across a cool web-site which you could appreciate. Take a search should you want.